अ‍ॅपशहर

उमवित विद्यापीठस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आज (दि. १९) पासून पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन (पुरुष व महिला) स्पर्धांना प्रारंभ होत आहे.

Maharashtra Times 19 Dec 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम university level badminton competition start today at nmu jalgaon
उमवित विद्यापीठस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आजपासून


उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आज (दि. १९) पासून पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन (पुरुष व महिला) स्पर्धांना प्रारंभ होत आहे.

विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा होत असून, यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोवा या पाच राज्यातील ८१ विद्यापीठांचे खेळाडू सहभागी होत आहेत. आज (दि. १९) सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद््घाटन बॅडमिंटनपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद घाटे यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील अध्यक्षस्थानी असतील. दिवसभरात पुरुष व महिलांचे मिळून ५५ सामने होणार आहेत.

पुरुष बॅडमिंटन स्पर्धेत ४९० खेळाडू सहभागी होत असून, या संघांसमवेत १५० संघ व्यवस्थापक/ प्रशिक्षक येणार आहेत. महिला बॅडमिंटन स्पर्धेसाठी ७८ विद्यापीठांचे ३१० महिला खेळाडू व १२५ संघ व्यवस्थापक/प्रशिक्षक येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र (पुरुष-२२, महिला-२२), गुजरात (पुरुष-२६, महिला-२५), मध्य प्रदेश (पुरुष-१२, महिला-१०), राजस्थान (पुरुष-२०, महिला-२०) आणि गोवा (पुरुष-०१, महिला-०१) असे संघ या स्पर्धेत असणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज