अ‍ॅपशहर

वाघूर धरणाचे पाणी पिण्यास योग्य

शहरात वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वाघूर धरणातील आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते.

Maharashtra Times 27 Mar 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waghur dam water safe to drink
वाघूर धरणाचे पाणी पिण्यास योग्य


शहरात वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वाघूर धरणातील आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. तपासणीअंती हे पाणी पिण्यास योग्य असल्याबाबतचा अहवाल मनपा प्रशासनाकडे प्राप्त झालेला आहे.

गेल्या दोन वर्षात झालेल्या समाधानकारक पावसामुळे वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसांडून वाहत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने वाघूर नदी व सूर, कांग या उपनद्यांमध्ये असलेला पालापाचोळा, शेवाळ तसेच औद्योगिक टाकाऊ वस्तू धरणातील पाण्यात मोठ्या प्रमाणावर साचलेले आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे धरणातील पाण्याची डिकॉम्पोझिशन प्रक्रिया वेगाने होऊन गॅसेसमुळे पाण्यास दुर्गंधीयुक्त वास येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. उमाळा जलशुद्धीकरण केंद्रात ब्लिचिंग पावडर, तुरटी व क्लोरिन गॅस याची योग्य प्रमाणात रासायनिक मात्रा देऊन पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे, असेही विभागाने सांगितले आहे. त्यावर उपाययोजना करण्यात येत असल्याचे अभियंता खडके यांनी सांगितले.

दरम्यान, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वाघूर धरणातील आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. याच पाण्याचे नमुने तपासणीसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतदेखील पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज