अ‍ॅपशहर

पाडळसरे धरणास जलआयोगाची मान्यता

तालुक्यासह जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प तथा पाडळसरे धरणास केंद्रीय जलआयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या बुधवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता या धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार ए. टी. पाटील यांनी दिली. या मान्यतेमुळे धरणास लवकरच एकरकमी निधी मिळून धरण पूर्णत्वाचे स्वप्न पूर्ण होईल, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Times 30 Aug 2018, 5:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमळनेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water commission approval to padalsare dam project in jalgaon district amalner taluka
पाडळसरे धरणास जलआयोगाची मान्यता

तालुक्यासह जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प तथा पाडळसरे धरणास केंद्रीय जलआयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या बुधवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता या धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार ए. टी. पाटील यांनी दिली. या मान्यतेमुळे धरणास लवकरच एकरकमी निधी मिळून धरण पूर्णत्वाचे स्वप्न पूर्ण होईल, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

या धरणाबाबत दिल्लीत खासदार पाटील यांनी केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्य मंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय जलआयोगाचे चेअरमन एस. मसूद हुसेन यांची भेट घेतली. यानंतर जल आयोगाच्या बैठकीत पाडळसरे धरणाच्या प्रकल्पास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

पाडळसे धरण पूर्ण करण्याची या सरकारची मनस्वी इच्छा असली तरी प्रत्यक्षात केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक मान्यतेअभावी सारे प्रयत्न असफल ठरत होते. मात्र, याच मान्यतेसाठी आपण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. अखेर ही मान्यता मिळाली असून, आता लवकरच या धरणाचा प्रधानमंत्री सिंचाई योजना अथवा बळीराजा योजनेत समावेश होऊन लवकरच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एकरकमी मोठा निधी मिळेल. तसेच धरणाचे काम वेगाने सुरू होऊन अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती होईल, अशी भावनाही खासदार पाटील यांनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज