अ‍ॅपशहर

‘आमचं ठरलंय...भांडणे लावू नका’

विधासभेत भाजप-शिवसेना युती आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दुसऱ्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम आम्हाला करावे लागेल, हे आमचे ठरले आहे. अशावेळी माध्यमांनी आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये, या शब्दांत माजी मंत्री सुरेश जैन यांनी माध्यमांच्या युतीवरील प्रश्नांवर उत्तर दिले. मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजी महोत्सवात पत्रकारांशी बोलत होते. या भजी महोत्सवात सुरेश जैन व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एकमेकांना भजी भरवित युतीची वीण घट्ट केली.

Maharashtra Times 28 Jul 2019, 5:00 am
महोत्सवात जैन-महाजनांनी भरविली एकमेकांना ‘युती’ची भजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_1219

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

विधासभेत भाजप-शिवसेना युती आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दुसऱ्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम आम्हाला करावे लागेल, हे आमचे ठरले आहे. अशावेळी माध्यमांनी आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये, या शब्दांत माजी मंत्री सुरेश जैन यांनी माध्यमांच्या युतीवरील प्रश्नांवर उत्तर दिले. मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजी महोत्सवात पत्रकारांशी बोलत होते. या भजी महोत्सवात सुरेश जैन व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एकमेकांना भजी भरवित युतीची वीण घट्ट केली.

मराठी प्रतिष्ठानतर्फे शनिवारी मेहरूण तलावावरील कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुरेश जैन यांनी एकमेकांना भजी भरवून युती मजबूत असल्याचा संदेश दिला. भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे व सुरेश जैन यांनीदेखील एकमेकांना केक भरवला. या पार्श्‍वभूमीवर, आगामी विधानसभेपर्यंत हा गोडवा टिकेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर सुरेश जैन यांनी आमची युती आहे. त्यामुळे कुणाला तरी एकालाच उमेदवारी मिळेल. आमच्यात ठरले आहे की, ज्याला उमेदवारी मिळेल. त्याचे काम दुसऱ्याला करावे लागेल. त्यामुळे आमच्यातील गोडवा विधानसभेपर्यंत टिकेल. फक्त मीडियाने आमच्यात भांडण लावू नये, असे मिश्किल उत्तर दिले. याप्रसंगी माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज