अ‍ॅपशहर

पोलिस गस्तीवर नियंत्रण का?

गस्त घालणे हे पोलिसांचे कामच आहे. पोलिसांच्या या गस्तीवर नियंत्रणाची गरजच का? असा सवाल महसूलमंत्री तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

Maharashtra Times 15 Aug 2017, 4:00 am
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम why control on the police petroling questioned gaurdian minister chandrakant patil
पोलिस गस्तीवर नियंत्रण का?


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

गस्त घालणे हे पोलिसांचे कामच आहे. पोलिसांच्या या गस्तीवर नियंत्रणाची गरजच का? असा सवाल महसूलमंत्री तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. पोलिस मुख्यालयातील मंगलम सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे महाराष्ट्र पोलिस दलातील गणवेश प्रदर्शन, आरएफआयडी पेट्रोलिंग प्रणालीचे उद््घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपपोलिस अधीक्षक सचिन सांगळे, डीवायएसपी रशीद तडवी उपस्थित होते.

प्रास्ताविकात शहराच्या पोलिस गस्तीमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटी डिव्हाइस हे प्रणाली सुरू झाली आहे. राज्यात असे तंत्रज्ञान केवळ जळगाव जिल्ह्यातच वापरले जात असून, आगामी उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन करणाऱ्या २ हजार ५०० सीडींचे वितरण जिल्हाभरात केले जाणार असल्याचे सांगितले, असे पोलिस अधीक्षक कराळे यांनी सांगितले.

शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसह निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना आरएफआयडी प्रणाली वितरित करण्यात आली. या कार्यक्रमात उत्सवांच्या काळात नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत पोलिसांनी केलेले आवाहनाची ऑडिओ सीडीचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन, आरएफआयडी प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. उत्सवकाळात पोलिसांतर्फे घेण्यात येणार्‍या स्पर्धांमधील स्मृतिचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले.

तिरंगा पदयात्रा अाज

जळगाव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ७० व्या स्वातंत्र्यदिनी औचित्य साधून ७१ मीटर तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि. १५) सकाळी ९ वाजता मु. जे. महाविद्यालयातून पदयात्रेस सुरुवात होणार असून, पदयात्रेत विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पदयात्रेचा समारोप शिवतिर्थ मैदानावर होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज