अ‍ॅपशहर

'उटखेडा रोडचे रुंदीकरण करा'

शहरातील उटखेडा रोडला एका बाजूने असलेल्या खोल खड्डा, काटेरी झुडुपे व महावितरणची डी.पी. यामुळे हा रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. तो रुंद करावा याबाबत येथील रहिवाशांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

Maharashtra Times 17 Oct 2017, 4:00 am
रावेर : शहरातील उटखेडा रोडला एका बाजूने असलेल्या खोल खड्डा, काटेरी झुडुपे व महावितरणची डी.पी. यामुळे हा रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. तो रुंद करावा याबाबत येथील रहिवाशांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम width increases of utkheda road at raver
'उटखेडा रोडचे रुंदीकरण करा'


रावेर ते उटखेडा-खिरोदा पाल रस्ता ४० फुट रुंदीचा आहे. याठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे ४० फुटी रस्त्यापैकी उत्तरेकडील बाजूने २० फुट जागेतच रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. एखाद्या वेळेस मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याचा संभव नाकारता येत नाही से या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जनतेस न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन येथील रहिवाशांनी खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हाधिकारी, जळगाव, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग,तहसीलदार, पोलिस निरीक्षक रावेर यांना दिलेले आहे. निवेदनावर ६६ लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज