अ‍ॅपशहर

मेहरुणमधील ‘त्या’ वाइन शॉपचा परवाना रद्द करा

मेहरुण परिसरात वाइन शॉप सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या मद्याच्या दुकानाची परवानगी रद्द न केल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील नगरसेवकांसह नागरिकांनी दिला आहे.

Maharashtra Times 5 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wine shop license issue at jalgaon
मेहरुणमधील ‘त्या’ वाइन शॉपचा परवाना रद्द करा

मेहरुण परिसरात वाइन शॉप सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या मद्याच्या दुकानाची परवानगी रद्द न केल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील नगरसेवकांसह नागरिकांनी दिला आहे.

राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील दारुची दुकाने, वाइन शॉप बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक दुकाने बंद झाली. त्यामुळे सपना कॉम्प्लेक्समधील राज वाईन्स हेदेखील बंद झाले. त्यानंतर मेहरुण परिसरातील गट नं. २०/३, प्लॉट नं. २१ याठिकाणी वाइन शॉप स्थलांतरीत करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. परंतु, ही परवानगी देताना परिसरातील नागरिकांच्या कुठल्याही स्वाक्षऱ्या घेतलेल्या नाहीत. परिसरात कष्टकरी व श्रमिक नागरिक राहत असल्यामुळे याठिकाणी सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाइन शॉप स्थलांतराचा मंजूर केलेला प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील नगरसेवकांसह नागरिकांनी दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज