अ‍ॅपशहर

बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

तालुक्यातील उंबरखेडे येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तामसवाडी शिवारात शेतात काम करीत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra Times 13 Sep 2017, 4:00 am
चाळीसगाव ः तालुक्यातील उंबरखेडे येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तामसवाडी शिवारात शेतात काम करीत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि. ११) दुपारी ५ वाजता ही घटना घडली. महिलेच्या गळ्यावरील जखमेवरून बिबट्याचाच हल्ला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम womans death in a leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू


अलका गणेश अहिरे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. उंबरख‌ेडे येथे आपल्या परिवारासह राहण्यास असलेल्या अलका अहिरे यांची शेती पिंपळवाड म्हाळसा लगतच्या तामसवाडी शिवारात होती. सोमवारी त्या आपल्या कपाशीच्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या मानेचा लचका तोडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज