अ‍ॅपशहर

शिवजयंतीनिमित्त बाइक रॅली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात आज (दि. १९) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रविवारी (दि. १८) शहरातून महिलांनी भगवे ध्वजासोबत बाइक रॅली काढली.

Maharashtra Times 19 Feb 2018, 4:00 am
आज शहरात समितीकडून भरगच्च कार्यक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv jayanti jalgaon


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात आज (दि. १९) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रविवारी (दि. १८) शहरातून महिलांनी भगवे ध्वजासोबत बाइक रॅली काढली. तसेच यूथ फॉर हेल्प फाउंडेशनतर्फे शिवकॉलनीतील लिलाई बालकाश्रममध्ये नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या वेळी बालकांना मोफत चष्मेदेखील वितरीत करण्यात आले.

शहरात रविवारी (दि. १८) जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य मार्गावरून भव्य बाइक रॅली काढण्यात आली. यामध्ये महिलांसह तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शहरातून ही रॅली निघत असताना वातावरण भगवेमय झालेले होते. आज (दि. १९) शहरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून, शहर समितीकडून त्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे. शहरात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे स्टिकर, टी-शर्ट यांच्यासह विविध साहित्य विक्रीसाठी आले असून, शिवप्रेमींनी तेथे खरेदीसाठी गर्दी केली होती.

बालकाश्रमातील मुलांची नेत्र तपासणी

यूथ फॉर हेल्प फाउंडेशनकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १८) शिवकॉलनीतील लिलाई बालकाश्रममध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात डॉ. निखिल चौधरी यांनी शासकीय अपंग संमिश्र केंद्रातील १० बालकांची अत्याधुनिक कॉम्प्युटराइज्ड मशीनद्वारे तपासणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल सोनार यांनी केले तर आभार राकेश वाणी यांनी मानले. यशस्वितेसाठी चेतन वाणी, वसीम खान, सनी भालेराव, रॉबिन लुल्ला, तुषार भांबरे, सौरभ पुराणीक, अधीक्षक विठ्ठल पाटील, विशाल गंगावणे आदींनी परिश्रम घेतले. या शिबिरात केलेल्या तपासणीत बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये व्हिटामिन बी-१२ ची कमतरता असल्याचे आढळून आली. तसेच एका बालकाच्या डोळ्यात तिरळेपणा आढळून आला आहे. त्यामुळे यापैकी एका बालकाच्या डोळ्यावर तिरळेपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, इतरांच्या व्हिटामिन बी-१२ च्या वाढीसाठी मोफत औषधी पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनने दिली. शिबिरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या ४५ बालकांपैकी ८ बालकांना येत्या दोन दिवसात फाउंडेशनमार्फत चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच काही बालकांना औषधी व डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप मोफत देण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज