अ‍ॅपशहर

वीज कार्यालयावर महिलांचा ठिय्या

शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील पंचशील नगर, फुकटपूरा, तांबापुरा भागात रविवारी (दि. २७) रात्री १२ वाजेपासून वीजपुरवठा खंडीत झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील महिला तसेच नागरिकांनी सहाय्यक अभियंता कार्यालयावर सोमवारी (दि. २८) मोर्चा काढून महिलांनी दीड तास ठिय्या आंदोलन केले.

Maharashtra Times 29 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम womens agitation in mahavitran office at jalgaon
वीज कार्यालयावर महिलांचा ठिय्या


शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील पंचशील नगर, फुकटपूरा, तांबापुरा भागात रविवारी (दि. २७) रात्री १२ वाजेपासून वीजपुरवठा खंडीत झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील महिला तसेच नागरिकांनी सहाय्यक अभियंता कार्यालयावर सोमवारी (दि. २८) मोर्चा काढून महिलांनी दीड तास ठिय्या आंदोलन केले.

जळगावच्या औद्योगिक वसाहत परिसरातील पंचशील नगर, फुकटपूरा, तांबापुरा भागात रविवारी (दि. २७) १५ तास वीजपुरवठा बंद होता. यामुळे परिसरातील संतप्त १०० ते १५० नागरिकांनी मेहरूण तलाव परिसरातील सहाय्यक अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यात महिलांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. त्यांनी यावेळी आपला राग व्यक्त करीत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. एमआयडीसी परिसरातील शामा फायर वर्क्ससमोर असलेल्या डीपीचे कटआऊट कोणीतरी तोडल्याने परिसरात वीजपुरवठा बंद झाला होता. तो जोडण्यासाठी आमच्याकडे कटआऊट उपलब्ध नसल्यामुळे जोडणीला वेळ लागला. वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.


कार्यालयात अधिकारीच उपस्थित नाही

कार्यालयात अधिकारी नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे मोर्चेकरी महिलांनी वीजपुरवठा सुरू होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेतली. त्यांनी दीड तास मेहरूण भागातील वीजवितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक अभियंता यांनी कटआऊट उपलब्ध नसल्यामुळे वीज जोडणी होऊ शकली नाही. मात्र, त्वरित साहित्य उपलब्ध करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर संतापलेल्या महिलांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज