अ‍ॅपशहर

‘२५ कोटींच्या कामांची यादी अंतिम नाही’

जळगाव महापालिकेला मुख्यमंत्री यांच्याकडून मिळालेला २५ कोटी रुपयांच्या निधीतील कामांची यादी अद्याप अंतिम झाली नसल्याचा खुलासा आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी (दि. २७) केला. महापालिकेत डॉक्टरांच्या बैठकीसाठी महापौरांच्या दालनात आमदार भोळे आले होते.

Maharashtra Times 29 Mar 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम works list not final of 25 crore fund for city development
‘२५ कोटींच्या कामांची यादी अंतिम नाही’


जळगाव महापालिकेला मुख्यमंत्री यांच्याकडून मिळालेला २५ कोटी रुपयांच्या निधीतील कामांची यादी अद्याप अंतिम झाली नसल्याचा खुलासा आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी (दि. २७) केला. महापालिकेत डॉक्टरांच्या बैठकीसाठी महापौरांच्या दालनात आमदार भोळे आले होते. त्यावेळी मेहरूणमधील नगरसेवकांनी वॉर्डातील कामे घेतले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी हा खुलासा केला.

जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री यांनी २५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या कामावरून सत्ताधारी व विरोधक भाजपमध्ये कामे व श्रेयावरून नाट्य रंगले आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी या निधीची घोषणा केली होती. त्यानुसार निधी वितरित करण्याबाबतचा अध्यादेश सरकारच्या नगरविकास विभागामार्फत जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये विकास कामे निश्चित करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे आणि सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. निधीतील कामे महापालिकेकडून न होता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहेत. विशेष म्हणजे याअगोदर करण्यात आलेली सत्ताधारी यांची कामांची यादी डावलून नवीन कामांची यादी आमदार सुरेश भोळे यांनी बांधकाम विभागाला दिली आहे. महापौरांच्या दालनात आमदार सुरेश भोळे आले असता. माजी उपमहापौर व मेहरूणचे नगरसेवक सुनील महाजन यांनी आमदार भोळे यांना मेहरूण परिसरातील ४ कोटी रुपयांची कामे यादीतून काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक शामकांत सोनवणे, नितीन बरडेदेखील उपस्थित होते.

कामे रद्द नाहीतर प्रलंबित

यावर २५ कोटीच्या कामांच्या यादीतील कोणतेही कामे रद्द केले नाहीत. काही कामे प्रलंबित ठेवली आहेत. मुख्यमंत्री यांच्याकडून महापालिकेसाठी आणखी ५० कोटी रुपये मिळणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितल्याची माहितीही आमदार भोळे यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज