अ‍ॅपशहर

रावेरला योग दिनानिमित्त रॅली

पतंजली योगपीठ, भारत स्वाभिमान, युवा भारत व रोकडा हनुमान व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कार्यालय व शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगामुळे होणारे लाभ सांगून योगाभ्यास घेवून योग दिन साजरा करण्यात आला.

Maharashtra Times 22 Jun 2017, 4:00 am
रावेर : पतंजली योगपीठ, भारत स्वाभिमान, युवा भारत व रोकडा हनुमान व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कार्यालय व शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगामुळे होणारे लाभ सांगून योगाभ्यास घेवून योग दिन साजरा करण्यात आला. शहरातून मोटरसायकल रॅली काढून नागरिकांना योगा विषयक जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yoga awareness motorcycle rally at raver for international yoga day
रावेरला योग दिनानिमित्त रॅली


येथील तहसील कार्यालयात योगशिक्षक एन. एस. वैद्य यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी तहसीलदार विजयकुमार ढगे, पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलिस व महसूल विभागाचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सरदार जी. जी. हायस्कूल येथे वैद्य व शाळेतील शिक्षकवर्गाने मार्गदर्शन करून योगाभ्यास घेतला. मायक्रोव्हिजन स्कूलमध्ये संस्थेचे संचालक विजय गोटीवाले, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.

आदित्य इंग्लिश स्कूल, संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, सरस्वती विद्या मंदिर, मॉडर्न इंग्लिश स्कूल या शाळांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला. योगाचे महत्त्व व जागृती करण्यासाठी शहरातून सायंकाळी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रोकड हनुमान मंदिरावर पुजा करून रॅलीस सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी पतंजली योगपीठाचे युवा भारत जिल्हाध्यक्ष मनोज पाटील, व्यायामशाळेचे अध्यक्ष हरीश जगताप, प्रतिक महाजन, युवराज पाटील, भूषण शिंदे, जितेंद्र बर्वे, संजय पाचपोहे, भूषण देवकर, मयुर दारकोंडे, यश महाजन, अमीत पाटील, गुणवंत पाटील, कुणाल महाले, मुकेश बारी, नरेंद्र तायडे, सतीश पाटील, मयंक नगरिया, अक्षय मशाने, अजय सोनवणे, प्रवीण निंबाळकर यांनी परिश्रम घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज