अ‍ॅपशहर

लाख रुपये देऊन केलेली बायको दुसऱ्याच दिवशी पळाली; तरुणाची आत्महत्या

लाख रुपये देऊन दुसरं लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बायको पळून गेली. त्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे.

Authored byप्रविण चौधरी | Edited byभीमराव गवळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2020, 4:16 pm
जळगाव : लग्नासाठी १ लाख रुपये देवून बायको केली. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बायको पळून गेली. बायको मिळावी म्हणून ज्या महिलांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने फसवणूक झाल्याचा जबर धक्का बसल्याने जळगावातील तरुणाने विष प्राशन करीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींना पोलिसांनी आज सोमवारी अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Young man commits suicide
लाख रुपये देऊन केलेली बायको दुसऱ्याच दिवशी पळाली; तरुणाची आत्महत्या


कैलास संतोष चवरे (मुळ रा.सामसोद ता.जामनेर) हा तरुण एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करतो. तो जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील आपल्या बहिणीकडे गेल्या १२ वर्षांपासून राहत होता. चार वर्षांपुर्वी संतोष याचा घटस्फोट झालेला आहे. दुसरा विवाह करण्यासाठी कैलासची आई, बहिण आणि मेहुणे यांना शहरातील शनिमंदीराजवळ राहणारी लिलाबाई उर्फ भाभीहिने मलकापूर येथील लग्न जुळविणारी उज्वलाबाई उर्फ संगिताबाईहिच्याशी भेट घालून दिली. लग्नासाठी मुलगी दाखवून लग्न ठरवून देण्यासाठी या दोन्ही महिलांनी कैलासकडून यांनी १ लाख रूपये घेण्याचे ठरवले. यानंतर ३० जुलै रोजी सकाळी मलकापूर येथील १८ वर्षीय मुलीशी लग्न लावण्यात आले. त्याच ठिकाणी कैलास याच्या नातेवाईकांनी दोन टप्प्यात १ लाख रूपये या महिलांना दिले. कैलासचे लग्न झाल्यानतंर त्याच दिवशी सायंकाळी कैलास व त्याचे कुटुंबीय नववधूसह कुसुंबा गावात पोहोचले. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३१ जूलै रोजी सकाळी ११ वाजता ही नववधु कैलासचा मोबाईल घेऊन पसार झाली.

खुनाच्या आरोपीची जमावाकडून हत्या, पोलिसांसमोरच घडला प्रकार

महिलेचा पैसे परत देण्यास नकार


लग्नाच्या नावाने आपली फसवणूक झाल्याचे कैलासच्या लक्षात आल्याने त्याने दिलेले पैसे परत घेण्यासाठी लिलाबाईकडे धाव घेतली. पण लिलाबाईने कैलासला पैसे देण्यास नकार दिला. फसवणुक झाल्याने कैलास नैराश्यात गेला होता. त्याने ३ ऑगस्ट रोजी नैराश्यातून शनीमंदीर पोलीस चौकीजवळील ओट्यावर विषारी औषध घेतले. त्यानंतर अत्यवस्थ कैलासला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज ७ ऑगस्ट रोजी कैलासचा मृत्यू झाला. यानंतर कैलासचे मेहूणे संतोष पाटील (वय ३२, रा.कुसुंबा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नववधू, लिलाबाई उर्फ भाभी, संगिताबाई उर्फ उज्जवलाबाई या तिघींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन्ही महिलांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

जालना: बँकेतून लाखोंच्या रोकडसह तिजोरीही पळवली

नगरमध्ये राजरोस लुटमार; एसटीच्या वाहकाला मारहाण करत ४० हजार लांबवले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज