अ‍ॅपशहर

लहान भावास घेऊन मुंबई दर्शनासाठी, प्रवासात अनर्थ घडला; समोरचं दृश्य पाहून लहानग्याचा हंबरडा

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते गाळण रेल्वेस्थानकादरम्यान पाटलीपुत्र या धावत्या एक्सप्रेसमधून एका परप्रांतीय तरुणा रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

| Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2022, 6:16 pm
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते गाळण रेल्वेस्थानकादरम्यान पाटलीपुत्र या धावत्या एक्सप्रेसमधून एका परप्रांतीय तरुणा रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. गुलशन कुमार (वय २५ रा. शारदा प्रसाद, नुरपुर कासापुर, पो. छीतपालगढ, ता. प्रतापगड) असे मयत तरुणाचे नाव आहे. गुलशन हा त्याच्या लहान भावाला मुंबई दाखवण्यासाठी घेवून जात होता. मात्र, मुंबई पोहचण्यापूर्वी प्रवासात ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jalgaon Local News
लहान भावास घेऊन मुंबई दर्शनासाठी, प्रवासात अनर्थ घडला; समोरचं दृश्य पाहून लहानग्याचा हंबरडा


गुलशन कुमार हा आपल्या १३ वर्षीय भावाला मुंबई दाखवण्यासाठी घेवून जात होता. यासाठी तो प्रयागराज येथून पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये बसला. दरम्यान, रेल्वेने पाचोरा स्टेशन पार केल्यानंतर काही अंतरावरच गाळण रेल्वे स्थानकानजीक गुलशनचा पाय घसरला व तो रेल्वेतून खाली पडला. लहान भावाच्या डोळ्यादेखत ही घटना घडल्याने त्याने आरडाओरड करत प्रवाशांच्या मदतीने आपात्कालीन चैन ओढून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबल्यानंतर गुलशनचा भाऊ रेल्वेतून उतरुन घटनास्थळी धावत गेला. मात्र, तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते आणि गुलशनचा जागीच मृत्यू झाला होता. समोरचं दृश्य पाहून लहान भावाने जागीच हंबरडा फोडला.

पुण्यात तरुणाची भन्नाट आयडिया, काश्मीरच्या केशरची कंटेनरमध्ये शेती, लाखोंचं उत्पन्न मिळणार

या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका घेत घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मयत गुलशन कुमारचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख