अ‍ॅपशहर

‘व्हॅलेंटाइन’साठी तरुणाई सज्ज

‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त नेहमीपेक्षा काही नाविन्यपूर्ण गिफ्ट्सही आल्या आहेत. यात हार्ट बीट, म्युझिकल टेडी बीअर या गिफ्ट तरुणाईसाठी विशेष आकर्षण ठरल्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गिफ्टकडे तरुणाईचा कल पाहता या गिफ्टसोबतच टॉकिंग टेडींनाही मागणी वाढली आहे.

Maharashtra Times 14 Feb 2017, 1:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम youth ready for valentine day celebrate
‘व्हॅलेंटाइन’साठी तरुणाई सज्ज


‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त नेहमीपेक्षा काही नाविन्यपूर्ण गिफ्ट्सही आल्या आहेत. यात हार्ट बीट, म्युझिकल टेडी बीअर या गिफ्ट तरुणाईसाठी विशेष आकर्षण ठरल्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गिफ्टकडे तरुणाईचा कल पाहता या गिफ्टसोबतच टॉकिंग टेडींनाही मागणी वाढली आहे.

प्रेमाचे फूल म्हणून गुलाबाला महत्त्व आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला गुलाबाची मागणी वाढली आहे. हा दिवस सेल‌ब्रिेट करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन केले आहेत. व्हॅलेंटाइन डेसाठी बाजारात ‘आय लव्ह यू’अक्षर असलेली चॉकलेट गिफ्ट मिळत आहेत. तसेच चॉकलेट्सचे खास बुकेही आले आहेत. हार्टमध्ये म्युझिकल हार्ट बिट, हार्ट किचन, हार्ट पेंडलसह इतर प्रकार आहेत.

हार्टचे गिफ्ट ४० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. व्हॅलेंटाइन डे निमित्त ‘लव्हस्टोरी बुक’ आले आहेत. २०० ते हजार रुपयांपर्यंत हे बुक वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असल्याची माहिती विक्रेते नम‌शि पंचम‌िआ यांनी दिली. व्हॅलेंटाइन डेसाठी सोशल नेटवर्किंग साइट्सवरदेखील युवक एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर दिवसभर व्हॅलेंटाइन डेचे मेसेज सेंड केले जात आहेत.


शहरवासीयांना धावण्याविषयी जनजागृती व्हावी व आवड निर्माण व्हावी, त्यासाठी आम्ही ‘व्हॅलेटाइन डे’निमित्त आज, मंगळवारी सकाळी ६.३० वाजता ‘सिटी रन’चे आयोजन केले आहे. याचा मार्ग बहिणाबाई उद्यान-आकाशवाणी-काव्यरत्नावली चौक-महाबळ-संभाजीनगर स्टॉप तेथून पुन्हा परत असा राहणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे.

व्हॅलेंटाइन डेमुळे शाळा-कॉलेज परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकरणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या नावाखाली होणाऱ्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज