अ‍ॅपशहर

रेल्वेखाली झोकून तरुणाची आत्महत्या

पारोळा तालुक्यातील सार्वे येथील २५ वर्षीय तरुणाने जळगावातील सुरत रेल्वे गेटजवळील रुळावर रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २२) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली.

Maharashtra Times 23 Oct 2017, 4:00 am
जळगाव : पारोळा तालुक्यातील सार्वे येथील २५ वर्षीय तरुणाने जळगावातील सुरत रेल्वे गेटजवळील रुळावर रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २२) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. खिश्यात मिळून आलेल्या कागदपत्रावरून मृताची दोन तासानंतर ओळख पटली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम youth suicide at jalgaon railway station
रेल्वेखाली झोकून तरुणाची आत्महत्या


राजु एकनाथ मकासरे (वय २५ रा. सार्वे ता. पारोळा) असे मृताचे नाव आहे. राजूचा एक वर्षापूर्वीच विवाह झाला होता. तो हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. तो कामानिमित्त नेहमी सुरत येथे जात असे. तो दिवाळी असल्यामुळे गावाकडे आला होता. रविवारी दुपारी २.३० वाजेच्या पूर्वी सुरत रेल्वेगेट क्रमांक १४८ जवळील खांबा क्रमांक ३०४/११-१२ जवळ धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. राजूची पत्नी साधना प्रसुतीसाठी माहेरी गेली होती. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, वहिनी, पत्नी, मुलगी, बहीण असा परिवार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज