अ‍ॅपशहर

शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोरच खड्डा खोदून स्वत:ला गाडून घेतलं, कारण....

Jalna News Today : पीक विमा न मिळाल्याने त्रस्त झालेल्या दाभाडी मंडळातील या शेतकऱ्याने डाळींबाच्या नुकसानीचा विमा मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू केलं आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2022, 5:42 pm
जालना : आपल्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी बदनापूर तहसील कार्यालयासमोर संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आज अनोखं आंदोलन केलं. या मागणीसाठी एका शेतकऱ्याने खड्डा खोदून स्वतः ला गाडून घेत आंदोलन केलं आणि जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका या शेतकऱ्याने घेतली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmer agitation
शेतकऱ्याचं आंदोलन


अद्याप पीक विमा न मिळाल्याने त्रस्त झालेल्या दाभाडी मंडळातील या शेतकऱ्याने डाळींबाच्या नुकसानीचा विमा मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू केलं आहे. सदर शेतकऱ्याने याआधीही शासनाला अल्टिमेटम दिला होता. आमच्या हक्काचा पीक विम्याचा पैसा आम्हाला मिळालाच पाहिजे, असं म्हणत दाभाडी मंडळातील इतर शेतकरीही ८ तारखेपासून आपल्या शेतात स्वतः ला गाडून घेत हे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, पीक विम्याबाबत दाभाडी मंडळातील हवामान खराब असल्याचं कारण सांगून पीक विमा दिला जात नाही, असं या शेतकऱ्याचं म्हणणं असून आमच्या भागातच हे कसं होत आहे, असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज