अ‍ॅपशहर

लेकासोबत जावयाकडे जाताना खड्ड्यांनी जीव घेतला, ट्रकखाली चिरडून माऊलीचा करुण अंत

accident news : वास्तुशांतीचा कार्यक्रम आटपून उषा पवार स्कूटीवरुन आपल्या मुलासोबत जावयाकडे निघाल्या होत्या. लक्कडकोट येथील रस्त्यावरील खड्ड्यांमधे स्कूटी आदळून त्या पडल्या. याच वेळी मागून येत असलेल्या ट्रकने त्यांना चिरडले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2023, 9:00 am
जालना : घरगुती कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद येथून जालना येथे आलेल्या महिलेचा मार्गातील खड्ड्यांनी जीव घेतला आहे. जालना शहरातील लक्कडकोट भागात असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पडल्यावर मागून आलेल्या ट्रकने महिलेला चिरडले. औरंगाबाद येथील उषा योगानंद पवार (वय ६६ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. तर स्कूटी चालक मुलगा आनंद योगानंद पवार (वय ३५ वर्ष, रा.औरंगाबाद) याच्याही हाताला जबर मार लागला आहे. अपघातानंतर स्कुटी फरफटत गेल्याने स्कूटी चालकाचे कपडे सुद्धा फाटले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jalna Truck Bike Accident
ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू


स्कूटी खड्ड्यात आदळून महिला पडली

औरंगाबाद शहरातील एका ठिकाणी आयोजित वास्तुशांतीचा कार्यक्रम आटपून उषा पवार स्कूटीवरुन आपल्या मुलासोबत जावयाच्या घराकडे निघाल्या होत्या. लक्कडकोट येथील रस्त्यावरील खड्ड्यांमधे स्कूटी आदळून त्या खाली पडल्या. याच वेळी पाठीमागून येत असलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. यात उषा पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी सामान्य जिल्हा रुग्णालयात पाठविला.

महिलेच्या मृत्यूमुळे नागरिकांचा संताप

महिलेच्या मृत्यूमुळे नागरिक संतप्त झाले, नागरिकांनी घटनास्थळी जालना पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या विरोधात आंदोलन केले, सोबतच नागरिकांनी पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या प्रशासनाविरुद्ध रस्ता रोखून जोरदार घोषणाबाजी केली.

माझ्या बाळाला भेटायचंय, मित्राला फोन करुन रडला; विहिरीजवळ चप्पल दिसताच सर्वांना धस्स झालं!
जड वाहतुकीवर बंदीची मागणी

जालना शहरात सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी आहे तरी देखील लक्कडकोट ते दत्त मंदिर या रस्त्यावरून सर्रासपणे जड वाहनांची वाहतूक सुरु आहे. तरी शहर वाहतूक शाखेने या रस्त्यावरील वाहनांना बंदी घालावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

Nikki Yadav Case: निक्की म्हणाली आपण जीव देऊयात; तिच्या तोंडून 'तो' शब्द ऐकला न् साहिल गेहलोतने सगळं संपवलं
परिसरातील नागरीकांचा रोष पाहता पोलिसांनी लक्कडकोट भागातील दोन्ही बाजूंनी जड वाहनास बंदी घालण्यासाठी लोखंडी कमान किंवा इतर उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आहे.

महत्वाचे लेख