जालना : मक्याच्या पिकात अवैधरीत्या गांजाची झाडे लावली होती. पण पोलिसांना मिळालेल्या एका टीपमुळे शेतकऱ्याचे पितळ पडले उघडे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर गावात एका शेतकऱ्याने चक्क मक्याच्या पिकात लावलेली गांज्याची झाडे पोलिसांनी छापा मारुन जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रल्हादपूरमध्ये एका शेतकऱ्याने मक्याच्या पिकातच गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही धक्कादायक माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सदरील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन धाड टाकली असता अंदाजे लाख भर किंमत असलेल्या २१ किलो गांजाची झाडे लावलेली आढळून आली. पोलिसांच्या पथकाने ही झाडे जप्त करून आरोपीला अटक केली. दगडूबा धोंडूबा खेकाळे असं या शेतकऱ्याचं नाव असून शेतात मक्याचे पीक घेत असताना त्यांनी अवैधरीत्या गांजाच्या झाडांची लागवड केली होती.
मक्याचे पीक सध्या चांगलेच बहरत आलेले असल्याने गांजाची झाडे ओळखू येणार नाही असे त्यांना वाटले, पण कुणीतरी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असल्याने या शेतकऱ्याचे गांजा लागवडीचे पितळ उघडे पडले आहे. भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, विभागीय पोलीस अधिकारी बहुरे यांच्या पथकांनी प्रल्हादपूर गावातील गट क्रमांक ५१ मध्ये छापा टाकला. शेताच्या बांधावर गांजाची रोपे लावलेली पोलिसांना आढळली. पोलिसांनी ही रोपे नष्ट करून शेतमालक दगदूबा धोंडूबा खेकाळेला अटक केली. आरोपी विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.