अ‍ॅपशहर

जालना जिल्ह्यात दोन गटांमध्ये राडा: पोलिसांवरही दगडफेक; गोळीबारात ५ जखमी

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2022, 8:55 am
जालना : जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे गावाच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन गटात गुरुवारी दुपारी मोठा राडा झाला. तसंच गावात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत बंदोबस्तावरील अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस व्हॅनच्या, अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. (Jalna Violence News Update)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalna violence update
जालन्यात दोन गटांमध्ये तणाव


चांदई एक्को गावाच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन गटांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद वाढल्याने गुरुवारी गावात पोलीस दाखल झाले आणि मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आक्रमक झालेल्या जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संजय राऊतांच्या भेटीनंतर चक्रं फिरली? उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेसाठी रामदास कदमांना निमंत्रण, पण...

दरम्यान, सध्या गावात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस प्रशासन योग्य कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज