अ‍ॅपशहर

Exclusive : अंबाबाईचा उदो उदो! कोल्हापुरच्या मंदिरास भेट स्वरूपात मिळाला १७८६ मधील दुर्मिळ खजिना

Ambabai Devi Kolhapur : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अंबाबाई मंदिर संदर्भात ग्रंथालय उभा करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली असून या ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील एक हस्तलिखित प्राप्त झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

| Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2022, 6:36 pm
कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले श्री. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर... मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिराने अनेक शतकांचा इतिहास घडताना पाहिला आहे. इथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात अनेक भक्तांना मंदिराचा आणि शहराचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अंबाबाई मंदिर संदर्भात ग्रंथालय उभा करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली असून या ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील एक हस्तलिखित प्राप्त झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambabai devi kolhapur


अंघोळीसाठी गिझर चालू केला पण झाली मोठी चूक, गर्भवती असलेल्या जनरल मॅनेजरचं क्षणात आयुष्य संपलं
हे हस्तलिखित शकेल १७८६ मधील असून गुरू चारित्रच हस्तलिखित तर आहेच शिवाय दुर्मिळ देखील आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा गाणगापूर नरसिंहवाडी तसेच कारंजा येथील मध्ययुगीन कालखंडातील दत्त विभूती महाराज यांचे चरित्र असल्याचे गणेश नेर्लेकर यांनी म्हटले आहे. हे हस्तलिखित पूर्वीच्या हातभट्टीच्या कागदावर नैसर्गिक शाईपासून तयार करण्यात आले असून अशा हस्तलिखित ग्रंथांचा संदर्भांचा वापर करत पुस्तक निर्माण होत असते असेही त्यांनी सांगितले आहे.

या ग्रंथालयासाठी देवस्थापन समितीकडून जोरदार तयारी सुरू असून आणखी काही माहिती किंवा असे ग्रंथ हस्तलिखित भविकांकडे असतील तर ते मंदिरासाठी द्यावे असे आवाहन ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख