कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर शाखा व मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कैलास वानोळे, कृष्णात कोरे, दिलदार मुजावर, नियाज अत्तार, निशांत शिंदे, मुक्ता शिंदे, प्रमोद म्हेत्रे, संघसेन जगतकर, दिलीप कांबळे, रमेश वडणगेकर, अमर शिंगाटे, प्रा. अफताब जमादार यांनी रक्तदान केले. याप्रसंगी लेखक राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. सुभाष कोळी, सीमा पाटील, सुजाता म्हेत्रे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. संयोजन डॉ. के. एल. माळवदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
अंनिसतर्फे रक्तदान शिबिर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर शाखा व मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...
Maharashtra Times 23 Aug 2018, 4:00 am