कोल्हापूर: आण्णा ग्रुपतर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवस्वरुपनगर येथे शनिवारी (ता.२२) मोफत हृदयरोग तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिवस्वरुपनगर, महादेव मंदिराशेजारी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत शिबिर होणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती व आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होईल. नागरिकांनी आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष व पाचगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सागर दळवी, ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश घोरपडे, सचिव प्रतिक मुळीक, खजानीस निलेश पवार यांनी केले आहे.
हृदयरोग तपासणी शिबिर
आण्णा ग्रुपतर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवस्वरुपनगर येथे शनिवारी (ता२२) मोफत हृदयरोग तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे...
Maharashtra Times 21 Sep 2018, 4:00 am