अ‍ॅपशहर

‘कॅशलेस‘व्यवहारातून हायटेक चोरी

कोल्हापूर: नोटाबंदीनंतर वाढलेल्या कॅशलेस व्यवहारामुळे चोरीच्या पद्धतीतील बदल होऊन हायटेक चोरी ठळकपणे पुढे आली आहे. तंत्रज्ञानाचा दूरूउपयोग करून बॅकेतून परस्पर पैसे खात्यावर वर्ग करून घेतले जात आहेत. श‌निवारी बँक ऑफ महाराष्ट्र, बालिंगा शाखेतून हा प्रकार उघड झाल्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही राज्यातील विविध भागातील आहेत. तिघांनीही कॅशलेस व्यवहारातून डल्ला मारून पैसे राज्यभरातील विविध बँकेतील‌ शाखेतील खात्यावर वर्ग केले आहेत. यामुळे ऑनलाइन, कॅशलेस व्यवहार सुरक्षीत आहे, पैशांची चोरी करता येत नाही, असा केला जात असलेला दावा फोल ठरला आहे.

Maharashtra Times 20 Mar 2017, 3:00 am
Bhimgonda.Desai@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cashless banking robbery matter kolhapur
‘कॅशलेस‘व्यवहारातून हायटेक चोरी


Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर: नोटाबंदीनंतर वाढलेल्या कॅशलेस व्यवहारामुळे चोरीच्या पद्धतीतील बदल होऊन हायटेक चोरी ठळकपणे पुढे आली आहे. तंत्रज्ञानाचा दूरूउपयोग करून बॅकेतून परस्पर पैसे खात्यावर वर्ग करून घेतले जात आहेत. श‌निवारी बँक ऑफ महाराष्ट्र, बालिंगा शाखेतून हा प्रकार उघड झाल्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही राज्यातील विविध भागातील आहेत. तिघांनीही कॅशलेस व्यवहारातून डल्ला मारून पैसे राज्यभरातील विविध बँकेतील‌ शाखेतील खात्यावर वर्ग केले आहेत. यामुळे ऑनलाइन, कॅशलेस व्यवहार सुरक्षीत आहे, पैशांची चोरी करता येत नाही, असा केला जात असलेला दावा फोल ठरला आहे.

नोव्हेंबरमध्ये जुन्या ५००, १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर चलन टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने कॅशलेस व्यवहाराला चालना दिली. बँकांनी विविध प्रकारचे अॅप, अॅप्लिकेशन तयार करून कॅशलेश व्यवहाराची व्यवस्था निर्माण केली. तंत्रज्ञानातील चांगले ज्ञान असलेले चोरटे सक्रिय झाले आहेत. कॅशलेसमधून व्यवहार वाढले असतानाच्या कालावधीत डिसेंबर महिन्यात तिघा चोरट्यांनी १५ लाख रुपये आपल्या खात्यावर वर्ग करून घेतले.

पैसे चोरले कसे, याचा शोध घेतल्यानंतर तंत्रज्ञानाचा दुरूपयोग झाल्याचे समोर आले आहे. बालिंगा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या समायोजित खात्यातून १५ लाख परस्पर वर्ग केल्याचे व्यवस्थापक सावंता माळी यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी महा-यूपीआय या मोबाइलवरील अॅप्लिकेशनचा वापर करून या शाखेतील शिंगणापूर (ता. करवीर) येथील अनिता भगवान पाटील यांचा खातेक्रमांक हॅक केल्याचे दिसून आले. पाटील यांच्या खात्यावरील बॅलन्स पाहिल्यानंतर कमी झालेला नव्हता. मात्र बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या समायोजित खात्यातून पैसे कमी झाले होते. समायोजित खात्यातून वर्ग झालेल्या खात्यांच्या केवायसी क्रमाकावरून संबंधित खातेदारांनी नावे शोधण्यात आली.

दरम्यान, १ ते २० डिसेंबर २०१६ या कालावधीत एचडीएफसी बँकेच्या नांदूरा शाखेतील राजेश बुडुखले यांच्या खात्यावर १ लाख आणि अॅक्सेस बँकेच्या खामगाव शाखेच्या खात्यात ३ लाख, युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील राजेंद्र बर्डे यांच्या खात्यावर १० लाख, अॅक्सेस बँकेच्या चिखली शाखेतील जितेंद्र मारूती रिंधे यांच्या खात्यावर १ लाख असे एकूण १५ लाख वर्ग झाल्याचे समजले. कॅशलेसमधील चोरीची पध्दती समोर आली.
महा-यूपीआय काय ?

मोबाइलवरून पैशांची देवाण, घेवाण करण्यासाठी बँकांनी महा-यूपीआय अॅप्लिकेशन लॉच केले. ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेचे हे अॅप्लिकेशन इंटरनेटवरून मोबाईलवर डाऊलोड करता येते. त्यानंतर अॅप्लिकेशन सुरू करून पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यापुर्वी पासवर्डचीही देवाण घेवाण करावी लागते. या अॅप्लिकेशनचा वापर करूर रोज १ लाख रूपये पाठवता येतात. त्याचा गैरवापर तिघांनी केला आहे.

पुल अकाऊंट कशासाठी ?

प्रत्येक खातेदाराचे पैसे जमा होणे, काढणे यांची माहिती एका ‌‌क्लिकवर कळण्यासाठी बँकांचे पुल अकाउंट असते. ते बँकांच्या सोयीसाठी असते. खातेदारांनी बँकेतून केलेल्या प्रत्येक व्यवहाराचे रेकॉर्ड या अकाउंटवरून मिळते. अकाउंटवरून पैसे काढल्याचे मोबाइलवर मेसेज येतो. पैसे काढल्यानंतरही बॅलेन्सची माहिती मिळते. वैयक्तिक खात्यावरील पैसे काढले असते तर चोरी उघड होईल म्हणून चोरट्यांनी खातेदारांऐवजी पुल अकाउंटवरून पैसे वर्ग केले आहेत. यावरून चोरट्यांना तंत्रज्ञाबरोबच बँकिंगमधीलही सखोल माहिती असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज