अ‍ॅपशहर

कार्यालयातच महिला कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी

म टा प्रतिनिधी, कोल्हापूरजिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी कार्यालयातच वादावादी झाली...

Maharashtra Times 24 Oct 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी कार्यालयातच वादावादी झाली. एकेरी भाषेचा वापर, अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

दुपारच्या सुमारास हा प्रकार घडल्याने शिक्षण विभागात काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. विभागातील अन्य अधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकींना अपशब्द वापरल्याची चर्चा विभागात आहे. विभागातील अधिकाऱ्यांनी हा वाद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यापर्यंत पोहचविला. मित्तल यांनी या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना एक आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज