अ‍ॅपशहर

कोल्हापूर: मुंबईहून आलेला ड्रायव्हर करोना संशयित

कोल्हापुरात एका वाहनचालकाला करोनाची लागण झाल्याचा संशय आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच तो मुंबईला गेला होता. विदेशातून आलेल्या व्यक्तीला आणण्यासाठी तो गेला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2020, 2:13 pm
कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील २९ वर्षीय वाहनचालक करोनासंशयित असल्याचं समोर आलं आहे. त्याला बुधवारी रात्री उशिरा सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. २२ मार्चला तो मुंबईला गेला होता. परदेशातून आलेल्या इचलकरंजीच्या व्यक्तीला त्याने आणले होते. त्यांनतर आता ११ दिवसांनंतर त्याच्यात करोनाची लक्षणे दिसू लागली आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona suspected


नगरमध्ये आढळले सहा नवे करोना रुग्ण; दोघे 'तबलिगी'

तबलिगी जमात: पिंपरीतील 'ते' दोघे करोनाबाधित

पालकमंत्री सक्रीय

करोनाच्या संकटास जिल्ह्यात चितपट करण्यासाठी तीन आठवड्यांपासून पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून आहेत. प्रोटोकॉलची झूल आणि पोलिसांच्या बंदोबस्ताचे कवच बाजूला सारून ते स्वत: सक्रिय झाल्याने प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे प्रशासनासही चांगले बळ मिळाले आहे. करोनाच्या हद्दपारीसाठी संचारबंदी, सामाजिक अलिप्ततेची काटेकोर अंमलबजावणी करताना, होणाऱ्या गैरसोयींवरून नागरिकांचा संयम सुटणार नाही, अशी दुधारी भूमिका ते प्रमुख अधिकाऱ्यांना विश्वासात घेत कौशल्याने निभावत आहेत.

महाराष्ट्रात निजामुद्दीनची पुनरावृत्ती नको: पवार

'तबलिगी'च्या कार्यक्रमातील २५ जण ठाण्यात

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज