अ‍ॅपशहर

कोल्हापूरच्या कणेरी मठात उभारणार अद्ययावत ऑक्सिजन प्लांट

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि औषधांचा तुवटडा जाणवत आहे. आता हा तुटवडा दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता कणेरी मठात अद्यावत ऑक्सिजन प्लांट उभारणार आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 13 May 2021, 9:11 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक जाण ठेवून सर्वसामान्य जनतेच्या, निसर्गाच्या, आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच संपन्न होत आलेला आहे. यावर्षीचाही वाढदिवस सामाजीक उपक्रम म्हणून कणेरी मठात अद्यावत ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून साजरा होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम oxygen cylinder
कणेरी मठात उभारला जणार अद्ययावत ऑक्सिजन प्लांट


यापूर्वी केलेल्या वाढदिवसांमध्ये रद्दीच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारून ती रद्दी व आपल्याकडील मदत देवून स्वयंसिद्धा संस्थेस प्रोजेक्टर प्रदान करण्यात आला. जीवनरक्षक दिनकर कांबळे यांचा विमा उतरवण्यात आला. रोपांच्या माध्यातून शुभेच्छा स्वीकारून, शहरातील वाढते प्रदूषण आणि तापमान वाढ रोखण्यासाठी झाडे लावण्याची गरज ओळखून जवळपास ३५ हजार रोपे केएसबीपीच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी लावून शहराचे सौदर्य खुलवून पर्यावरण रक्षणाचा संदेश ही दिला. शेतकऱ्यांना खते मिळाली तर त्याला थोडासा हातभार लावता येईल उद्देशाने खतांच्या स्वरूपात शुभेच्छा स्विकारून जिल्ह्यातील ५० हजार शेतक-यांना युरीया या दाणेदार खताचे नियोजनपूर्ण वितरण करण्यात आले. वयोवृद्ध लोकांची सेवा करणारे सावली केअर सेंटर उभारणीसाठी मदत. अशा नाविन्यपूर्ण कामातून संकल्प बांधून वाढदिवस साजरा करण्यात येतो.

गेल्यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यम उपक्रम म्हणजे ताप मोजण्यासाठी लागणारे थर्मामीटर गरजू, दु्र्लक्षित घटकांना दिले तसेच अनेकांना थर्मल मशीन, मोठया सोसायटी व अपार्टमेंट ठिकणी सॅनिटायझर स्टँड ही देण्यात आले.

यावर्षीचा १० जून रोजी होणारा वाढदिवस सध्याच्या करोना काळात रेमडीसिव्हर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड, लस मिळण्यात संदिग्धता यामुळे नातेवाईक व रुग्णाची ससेहोलपट होताना दिसत आहे. यातून रुग्णांना व नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी अनेक उपक्रम आमदार चंद्रकांत पाटील यांनी या वर्षभराच्या काळात संपूर्ण महराष्ट्रभर प्रदेशाध्यक्ष या नात्याने भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबवले. मागील वर्षी कणेरी मठ येथे ४० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या पार्श्वभूमीवर कणेरी मठ येथील प.पू.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज व चंद्रकांत पाटील यांनी कणेरी येथील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्याचा संकल्प केला असून या प्लांट उभारणी करीता सुमारे ६० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कोल्हापूर मधील जनता ही शाहू प्रेमी असून प्रत्येक संकटाच्या काळात आपले दातृत्व दाखवून देत असते. म्हणून यावर्षीचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आपण कणेरी मठावरील ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून करोना काळात ऑक्सिजनची कमतरता कमी करण्यासाठी व इतरवेळेस कन्व्हर्टर मधून ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरून अन्यत्रही उपयोगात आणता येईल.

ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी यावेळच्या या उपक्रमात आपणही सहभागी होऊन दादांना शुभेच्छा देण्यासाठी कणेरी मठाच्या ‘सिद्धगिरी गुरुकुल फौंडेशन’, स्टेट बँक ऑफ इंडिया, करंट खाते क्र.३६४८५४२३४३८ IFSC कोड SBIN 00007958, एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगांव या खात्यावर चेक स्वरूपात देऊन या सामाजिक उभारणीत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन वाढदिवस समितीच्या वतीने राहूल चिकोडे यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज