२५ ऑक्टोबर २०१७ रोजी कोल्हापूर विमानतळाला प्राधिकरण आणि हवाई वाहतूक संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या पथकाने तीनवेळा पाहणी केली. पहिल्या पाहणीत जिल्हा प्रशासनाला सुमारे वीस अटींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. अटींची पू्र्तता केल्यानंतर टूबी लायसन्स देण्यात आले. विमानसेवेचा आनंद घेण्यासाठी विमानतळावरून १७ एप्रिलला मुंबईकडे विशेष विमान झेपावले. या विमानातून अंध, अपंग, शेतकरी दाम्पत्य, कचरा वेचक महिलांनी प्रवास केला. केवळ चित्रात आणि चित्रपटात विमान पाहिलेल्यांना प्रत्यक्ष विमान प्रवासाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
डीजीसीए पाहणी ते विशेष विमान
२५ ऑक्टोबर २०१७ रोजी कोल्हापूर विमानतळाला प्राधिकरण आणि हवाई वाहतूक संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली या पथकाने तीनवेळा पाहणी केली...
Maharashtra Times 22 Apr 2018, 5:00 am