अ‍ॅपशहर

डॉ. चौगुलेंचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे

म टा प्रतिनिधी, कोल्हापूरसांगलीतील बेकायदा गर्भपात प्रकरणी डॉ...

Maharashtra Times 20 Sep 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सांगलीतील बेकायदा गर्भपात प्रकरणी डॉ. विजयकुमार चौगुले याच्यासंदर्भातील अहवाल आरोग्य विभागाने आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे सादर केला आहे. डॉ. चौगुले हा गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. सांगली येथील गणेशनगर येथे बेकायदा गर्भपात प्रकरणी त्याला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. बेकायदा गर्भपात प्रकरणातील त्याचा सहभाग, पोलिस कारवाईसह अन्य तक्रारींची माहिती आरोग्य विभागाने जमवली आहे. सांगली महापालिकेचा अहवाल, पोलिसाकडून उपलब्ध माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे सादर केली आहे. आरोग्य सेवा संचालनालयामार्फत त्याच्यावर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज