अ‍ॅपशहर

नालेसफाई गेली गाळात

कोल्हापूर : महापालिकेच्या सफाई विभागाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांनी भरलेले नाले व गटारी दिसत आहेत. केवळ या दुर्लक्षामुळे छोट्या गटारींपासून मोठ्या नाल्यांपर्यंतचा प्लास्टिक तसेच अन्य कचऱ्याचा प्रवास विनाअडथळा होत असून हाच कचरा शहरात ठिकठिकाणी पाणी साठण्यास कारणीभूत ठरत आहे. गटार, नाले तसेच विविध ठिकाणी फुटपाथखाली असलेल्या गटारींची सफाई कुणी तक्रार केली अथवा पावसाचे पाणी साठले तरच करायची हा महापालिकेच्या कारभाराचा फंडा ठरला आहे.

Maharashtra Times 27 Sep 2017, 3:00 am
Udaysing.patil@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drains cleanliness matter in kolhapur
नालेसफाई गेली गाळात


udaysingpatilMT

कोल्हापूर : महापालिकेच्या सफाई विभागाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांनी भरलेले नाले व गटारी दिसत आहेत. केवळ या दुर्लक्षामुळे छोट्या गटारींपासून मोठ्या नाल्यांपर्यंतचा प्लास्टिक तसेच अन्य कचऱ्याचा प्रवास विनाअडथळा होत असून हाच कचरा शहरात ठिकठिकाणी पाणी साठण्यास कारणीभूत ठरत आहे. गटार, नाले तसेच विविध ठिकाणी फुटपाथखाली असलेल्या गटारींची सफाई कुणी तक्रार केली अथवा पावसाचे पाणी साठले तरच करायची हा महापालिकेच्या कारभाराचा फंडा ठरला आहे.

महापालिका हद्दीत विविध भागातून छोटे मोठे नाले कुठे जयंती नाल्याला तर कुठे दुधाळी नाल्याला मिळतात. तर काही नाले परस्पर शहराबाहेरून पंचगंगा नदीच्या दिशेने वाहतात. या नाल्यांना भागातील छोट्या गटारींमधूनच पाणी येते. त्यामुळे गटारी स्वच्छ राहिल्या तर नाल्यांमधील कचऱ्याचे प्रमाणही आपोआपच कमी होईल, हे सोपे समीकरण आहे. पण गेल्या काही वर्षांपासून अनेक भागात रस्त्यावरील सफाईसाठी कर्मचारी पाठवले जात नाहीत. रस्त्याची सफाई होत नसताना गटारीतील कचरा काढण्याचे काम तर दूरचेच झाले आहे. परिणामी अनेक भागात नागरिक गटारीतील कचरा आपापल्या घरासमोरुन पुढे ढकलतात. त्यातूनच नाल्यांमध्ये येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नुकत्याच झालेल्या पावसांमध्ये पाहिल्यास नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याची वस्तुस्थिती पहायला मिळते. पहिल्या पावसामुळे काही भागातील नाल्यातील कचरा साफ झाला. पण अन्य ठिकाणच्या नाल्यांमधील कचरा थोडे अंतर पुढे जाऊन साठून राहिला.

नाल्यांकडे जसे दुर्लक्ष होत आहे तशीच फुटपाथखाली असलेल्या तसेच अनेक भूमिगत गटारींची अवस्थाही आहे. आयआरबीने केलेल्या तसेच नगरोत्थान योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा गटारी आहेत. त्यांची सफाई आजतागायत महापालिकेने केलेली नाही. जवळपास दीड ते दोन फूट खोल असलेल्या गटारींची नीट स्वच्छता झाली असती तर त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले असते. तसेच रस्त्यावर पाणी येण्याचा प्रश्नच राहिला नसता. पण त्या गटारीतील कचरा काढण्याबाबत सातत्याने तक्रारी करुनही काही हालचाल केलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, हॉकी स्टेडियम रस्ता, जयंती नाला, बसंत बहार रोड, फोर्ड कॉर्नर, राजारामपुरी चौक या परिसरात कायम पाणी साठत आहे. अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून या परिसरातील गटारींच्या तोंडावर साठणारा कचरा काढत असतात. पण पावसात मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून येत असल्यामुळे गटारी तुंबतातच. अनेक गटारींमध्ये रस्त्यावरुन वाहून येणारे पाणी जाण्यासाठीचे मार्ग अपुरे आहेत. त्यामुळे ट्रेझरी ऑफिस, राजारामपुरी पहिली गल्ली, कोंडा ओळ, व्हीनस कॉर्नर या भागात पाणी साठून राहते.

नाल्यांची स्वच्छता नाहीच

महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापुर्वी नाल्यांची, गटारींची स्वच्छता केली जात होती. त्यासाठी भागातील कर्मचाऱ्यांना नेमले जायचे. त्यासाठी स्वतंत्र असा निधी दिला जात नाही. पण सध्या नियमितपणे कुठे तरीच ही स्वच्छता केल्याचे पहायला मिळाले. तसेच भागातील नागरिकांकडूनही नाल्यांच्या स्वच्छतेसाठी कुणी आले नसल्याचेच उत्तर मिळाले. त्यामुळे ज्या दाटवस्तीच्या भागातून नाला वाहतो, तिथे नाल्यात कचरा होता. मध्यंतरीच्या जोरदार पावसामुळे तो कचरा पुढे गेला. पण गटारी, छोट्या नाल्यांमधील कचरा काढण्यात आला नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार झाले आहेत.

रस्त्यावरील पाणी गटारीत जाण्यासाठी

रस्त्यावरून वाहून येणारे पाणी गटारीमध्ये जाण्यासाठी एकतर मोठी इनलेट ठेवायला हवीत. अन्यथा ठिकठिकाणचे पाणी त्या त्या गटारींमध्ये जाण्यासाठी जाळ्या टाकण्याचे प्रकार झालेले नाहीत. मुळात अनेक रस्त्यांवर गटारीच नाहीत ही बाबही गंभीर आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज