अ‍ॅपशहर

फास्टाची शिक्षण परिषद रविवारी

फुले-आंबेडकर शाहू टीचर्स असोसिएशन तथा फास्टा संघटनेच्या वतीने रविवारी (ता२५) शिक्षण परिषदेचे आयोजन केले आहे...

Maharashtra Times 25 Feb 2018, 7:23 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fasteeke education council sunday
फास्टाची शिक्षण परिषद रविवारी

कोल्हापूर : फुले-आंबेडकर शाहू टीचर्स असोसिएशन तथा फास्टा संघटनेच्या वतीने रविवारी (ता.२५) शिक्षण परिषदेचे आयोजन केले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शाहू स्मारक भवन येथे ही परिषद होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे प्रमुख डॉ. मर्झबान जाल प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच गौतमीपुत्र कांबळे, डॉ. टी. एस. पाटील, डॉ. पी. एस. कांबळे, प्रा. सुभाष दगडे, आदी तज्ज्ञांचे बीजभाषण होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज