बाजीराव खाडे यांचा सत्कार
म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे
कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनामा कमिटीवर सदस्यपदी करवीर तालुक्यातील सांगरुळचे राजीव गांधी पंचायतराज कमिटीचे सदस्य बाजीराव खाडे यांची निवड झाली. याबद्दल सांगरुळमध्ये पांडुरंग सेवा सोसायटी, दत्त दूध संस्था, खंडोबा दूध संस्था, मारुतराव खाडे हरहर महादेव दूध संस्था व गावातील विविध तरुण मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आर. बी. पाटील खत कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन तुकाराम नाळे होते.
बाजीराव खाडे म्हणाले, 'पक्षाने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देऊन ग्रामीण विकासाला चालना दिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार आणण्यासाठी युवकांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचवावीत.'
भगवान लोंढे, प्रा. टी. एस. जंगम, एम. बी. खाडे, कृष्णात चाबूक, नामदेव खाडे, एन. डी. खाडे, महेश खाडे, मुरलीधर कासोटे यांनी मनोगत व्यक्त केले. पांडुरंग सेवा संस्थेचे संचालक आनंदराव नाळे यांनी स्वागत केले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, करवीरच्या माजी सभापती सीमा चाबूक, पंचायत समिती सदस्या अर्चना खाडे, सांगरुळ शिक्षण संस्थेचे संचालक आनंदराव कासोटे आदी उपस्थित होते. कृष्णात खाडे यांनी आभार मानले.
फोटो : सांगरुळ येथे बाजीराव खाडे यांचा सत्कार करताना विनोद यादव. सोबत बाळासाहेब खाडे, तुकाराम नाळे, कृष्णात लव्हटे, सीमा चाबूक, अर्चना खाडे व इतर.