कोल्हापूर: मिरजकर तिकटी येथील एका बारमध्ये बिल देण्याच्या कारणावरुन मारामारी झाली. यावेळी बिअरच्या बाटल्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास एका बारमध्ये चार व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी बिअरची ऑर्डर दिली होती. त्यानंतर बिल देण्याच्या कारणावरुन मालक व चौघांत वाद झाला. दोघांनी बिअरच्या बाटल्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चौघेही तिथून निघून गेले.
बारमध्ये मारामारी
मिरजकर तिकटी येथील एका बारमध्ये बिल देण्याच्या कारणावरुन मारामारी झाली यावेळी बिअरच्या बाटल्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला...
Maharashtra Times 14 May 2018, 4:00 am