अ‍ॅपशहर

जयसिंगपुरात तीन दुकानांना आग

येथील शिरोळ-वाडी रोडवर असणाऱ्या दसरा चौकाच्या भिंतीलगत तीन दुकानांना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली.

Maharashtra Times 19 Jan 2017, 1:00 am
म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire in jaysingur
जयसिंगपुरात तीन दुकानांना आग


येथील शिरोळ-वाडी रोडवर असणाऱ्या दसरा चौकाच्या भिंतीलगत तीन दुकानांना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तीन दुकानांचे तीन लाखांचे नुकसान झाले असून दुकानांतील सर्व साहित्य जळून खाक झाले. पालिकेच्या दोन अग्निशामक बंबांच्या साह्याने ही आग आटोक्यात आणली.नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाजूच्या अन्य दुकानांमध्ये आगीचा शिरकाव झाला नाही.

शिरोळ-वाडी रस्त्यावरील गल्ली क्रमांक १७ ते २१ दरम्यान दसरा चौकाच्या भिंतीलगत नगरपरिषदेने व्यावसायिकांना खोकी उपलब्ध करून दिली आहेत. यापैकी गल्ली क्रमांक १८ व १९ यांमयामध्ये अजय स्वीट मार्ट, हुबळीकर ऑटोमोबाईल्स व भरत कोचिंग वर्क्स अशी तीन दुकाने शेजारीशेजारी आहेत.यापैकी अजय स्वीट मार्ट बंद होते. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भरत कोचिंग वर्क्स या दुकानात अचानक आग लागली. या दुकानात असलेल्या कोचिंगच्या कापड व अन्य साहित्यामुळे आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले. त्यामुळे शेजारी असणाऱ्या हुबळीकर ऑटोमोबाईल्स या दुचाकी दुरूस्त करणाऱ्या गॅरेजलाही काही वेळातच आगीने वेढले. आगीची झळ अजय स्वीट मार्ट या बंद दुकानालाही बसली. यामुळे या तीनही दुकानांचे मोठे नुकसान झाले.

आसपासच्या दुकानदारांनी व नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका इतका मोठा होता, की ती आग आटोक्यात आणणे त्यांना शक्य झाले नाही. दरम्यान, नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या. दोन्ही गाड्यांमधून पाण्याचा मारा करून ही आग मोठ्या प्रयत्नाने आटोक्यात आणली गेली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज