आजरा : किटवडे (ता. आजरा) येथील विवाहिता नीलम अमोल कांबळे (वय २४, सध्या रा. वाटंगी, ता. आजरा ) हिने आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पती व नातेवाइकांविरोधात शुक्रवारी आजरा पोलिसांत दिली. सप्टेंबर ते डिसेंबर २०१८ दरम्यान अमोल नारायण कांबळे, नारायण काशिबा कांबळे, प्रभावती कांबळे व सरस्वती कांबळे (सर्व रा. किटवडे) यांनी आपल्याला लथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वरील चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
छळप्रकरणी चौघांवर गुन्हा
किटवडे (ता आजरा) येथील विवाहिता नीलम अमोल कांबळे (वय २४, सध्या रा वाटंगी, ता...
30 9 Feb 2019, 4:00 am