अ‍ॅपशहर

गडहिंग्लजला सेनेचा ‘ना’राजीनामा

वरिष्ठांच्या मनमानीला कंटाळून गडहिंग्लज तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक राजीनामा देत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Maharashtra Times 21 Dec 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gadhinglaj shiv sena leaders resignations
गडहिंग्लजला सेनेचा ‘ना’राजीनामा


वरिष्ठांच्या मनमानीला कंटाळून गडहिंग्लज तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक राजीनामा देत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख सागर कुऱ्हाडे, मनोज पवार यांच्या सह सर्वच पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

गडहिंग्लज शहर व पाच जिल्हा परिषद मतदार संघातील उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक गेली अनेक वर्ष शिवसेनेवर निष्ठा ठेवून पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षवाढीसाठी काम करीत आहेत. तालुक्यात ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सेवा संस्था नगरपालिका आर्थिक पाठबळ नसतानाही स्वबळावर स्वखर्चाने निवडणुका लढवल्या आहेत. मात्र मर्जीतील लोकांना पदावर बसविण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याने सामूहिक राजीनामा देत असल्याचे पत्रकातून देण्यात आली आहे. पत्रकावर तालुकाध्यक्ष माने, शहरप्रमुख, कुराडे, पोवार, ग्राहक सेना तालुका प्रमुख बबन पाटील, दयानंद पाटील, वसंत नाईक, भरत जाधव शिवगोंडा पाटील यांच्यासह विभागप्रमुखांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पदाधिकाऱ्यांची समजूत घातली जाणार की बदल होणार याची उत्सुकता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज