जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी व शिरदवाड येथे पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. मजरेवाडी येथील कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेऊन एक लाख ६३ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर शिरदवाड येथील कारवाईत सहाजणांना ताब्यात घेतले असून, २६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कुरुंदवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
जुगार अड्ड्यांवर छापा
शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी व शिरदवाड येथे पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला...
Maharashtra Times 16 Nov 2018, 4:00 am