गोकुळ आज खुलासा सादर करणार
कोल्हापूर
राज्य सरकारच्या दूध खरेदी दराच्या आदेशाची पायमल्ली केल्याबद्दल बजावण्यात आलेल्या संचालक अपात्रतेच्या नोटिशीबाबत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ (गोकुळ) गुरुवारी (ता. ३) विभागीय उपनिबंधकांकडे खुलासा सादर करणार आहे. सरकारच्या आदेश डावलून दूध दर कमी केल्याबद्दल विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी गोकुळसह पुणे विभागातील १७ संघांना संचालक मंडळ अपात्र ठरवून प्रशासकांची नियुक्ती का करु नये, अशी नोटीस बजावली होती.