अ‍ॅपशहर

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरु

राज्य निवडणूक आयोगाने जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकसाठी ...

Maharashtra Times 17 Feb 2018, 2:32 pm
प्रभाग रचनेला सुरुवात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gram panchayat election program started
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरु


कोल्हापूर: राज्य निवडणूक आयोगाने जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. जिल्ह्यात सात मार्चपर्यत तहसीलदार प्रत्येक गावाचे नकाशांना अंतिम रुप देणार आहेत. नऊ मार्चपर्यत संबंधित गावचे तलाठी आणि ग्रामसेवकांनी स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करुन व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे आरक्षण निश्चित करणार आहेत. १२ मार्चपर्यत तहसीलदारांची समिती प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता देणार आहेत. १५ मार्चपर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदारांनी प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. २१ मार्चला प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर करावयाची आहे. तसेच २८ मार्चपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज