अ‍ॅपशहर

त्याबद्दल दादांचे आभार मानतो... हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचले!

राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्यांबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून ग्रामविकास हसन मुश्रीफ यांनी त्यांना पुन्हा डिवचलं आहे.

Authored byगुरुबाळ माळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2020, 4:50 pm
कोल्हापूर: राज्यपाल नियुक्त १२ जागासंदर्भात फडणवीस व राज्यपालांमध्ये आधीच काहीतरी ठरलंय हे माझं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी फेटाळलेलं नाही. मी खोटं बोलतोय असंही ते म्हणालेले नाहीत. त्यांनी एक प्रकारे माझ्या माहितीस दुजोराच दिलेला आहे,' असा दावा करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hasan mushrif again target bjp leader chandrakant patil
त्याबद्दल दादांचे आभार मानतो... हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचले!


'विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या बराच खल सुरू आहे. मंत्रिमंडळानं सुचवलेली नावं राज्यपाल मान्य करतील का, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळं विचारपूर्वक ही नावं पाठवली जाणार आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांच्या हवाल्यानं मुश्रीफ यांनी काल एक गौप्यस्फोट केला होता. 'ठाकरे सरकार देणार असलेली १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बाजूला ठेवणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्यात झालेल्या चर्चेत हे ठरलं आहे. चंद्रकांत पाटील हेच असं म्हणाले होते,' असं मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. ते योग्यच असल्याचा दावा मुश्रीफ यांनी आज केला आहे.

वाचा: चंद्रकांत पाटलांना हिमालयात जावे लागणार नाही; मुश्रीफांची टोलेबाजी

'मी दादांचे मनापासून आभार मानतो, कारण सन्माननीय राज्यपाल व सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामधील चर्चेबाबत वारणेवर त्यांनी जे वक्तव्य केले होते. त्याचा स्पष्ट इन्कार त्यांनी केलेला नाही. दुपारी १२ वाजता माझी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पुण्यामध्ये दादांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, 'राज्यपालांना संविधानाने अधिकार दिले आहेत, ते तसे करू शकतात, असं म्हणून विनय कोरे यांच्याशी राज्यपालनियुक्त सदस्यांविषयी झालेल्या चर्चेला पाटील यांनी एक प्रकारे दुजोरा दिला आहे,' असं मुश्रीफ यांचं म्हणणं आहे.

वाचा: मुंबईसाठी आता काँंग्रेसही मैदानात; मोदी सरकारला दिला इशारा

'मुश्रीफ यांचं विधान हास्यास्पद आहे, असं वक्तव्य संध्याकाळी त्यांनी केलं. मात्र, असं विधान आपण स्वतः केलेलं नाही, मुश्रीफ खोटे बोलत आहेत किंवा त्या भागातील जागृत देवस्थान श्री. जोतिबाची शपथ घेतो, असं काहीही म्हटलेलं नाही. दादांचा तो स्वभावही नाही. याचा अर्थ माझी माहिती योग्य आहे, असंही मुश्रीफ यांनी पत्रकात पुढं म्हटलं आहे.

TRP घोटाळा: ‘रिपब्लिक’ टीव्हीने एक कोटी रुपये वाटले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज