कोल्हापूर : सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी हिंदू जनजागृती समितीतर्फे शहरातून हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात आले. मिरजकर तिकटीपासून दिंडीला सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे फिरून दिंडीची सांगता शिवाजी चौक येथे झाली. या दरम्यान रणरागिणी पथकाने ढोल वादन, शौर्य जागरण करणाऱ्या मर्दानी खेळ सादर केले. सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, मनोज खाडे, स्वाती खाडे, अशोक चंदानी, दिलीप मानगांवकर, गोविंदराव देशपांडे, किरण कुलकर्णी, राजू हुंबे, मयूर तांबे यांच्यासह शिवसेना, वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, हिंदू महासभा, हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठा, इस्कॉन, पतित पावन संघटना, कोल्हापूर जिल्हा पुरोहित संघ, करवीर निवासिनी पुरोहित संघ, कुंभार समाज, राजू मर्दानी आखाडा, वन्दे मातरम युथ आर्गनायझेशन, संस्थान संस्था, हिंदू जनजागृती आदी संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातून हिंदू एकता दिंडी
सनातन संस्थेचे संस्थापक डॉ जयंत आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी हिंदू जनजागृती समितीतर्फे शहरातून हिंदू एकता दिंडी काढण्यात आली...
Maharashtra Times 14 May 2018, 4:00 am