अ‍ॅपशहर

गृहिणी पुरस्कार

तीन फोटो - वेदांतिकाराजे भोसले, अंजू तुरंबेकर, शिरीन शिंदे,यांना 'गृहिणी गौरव' पुरस्कार वेदांतिकाराजे ,शिरीन शिंदे, तुरंबेकर यांना गृहिणी ...

Maharashtra Times 26 Apr 2018, 5:00 am

तीन फोटो - वेदांतिकाराजे भोसले, अंजू तुरंबेकर, शिरीन शिंदे,यांना 'गृहिणी गौरव' पुरस्कार

वेदांतिकाराजे ,शिरीन शिंदे,

तुरंबेकर यांना गृहिणी पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे गृहिणी महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच महिलांना 'गृहिणी गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), देशातील पहिल्या हेल्थ केअर स्टार्टअप सुरु करणाऱ्या शिरीन शिंदे-चिंचोले (कोल्हापूर), फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर (गडहिंग्लज), दिव्यांग मुले व व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या डॉ. वर्षा भगत (नवी मुंबई), कचरावेचक महिला संघटक सरुबाई वाघमारे (पुणे) यांचा गौरव होणार आहे. सोमवारी (ता.३०) सासने ग्राऊंडवर सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रतिमा पाटील यांनी पत्रकातून दिली आहे.

सिनेअभिनेत्री प्रीती जांगियानी यांच्या हस्ते या पाच कर्तृत्वान महिलांचा सत्कार सोहळा होत आहे. वेदांतिकाराजे भोसले यांनी विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करुन महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले. अजिंक्यतारा शेतकरी सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून नवतंत्रज्ञानाची जनजागृती केली आहे.शिरीन शिंदे यांनी देशातील पहिल्या 'पीएस टेककेअर' या नावाच्या हेल्थकेअर स्टार्टअपची सुरुवात केली. हाँगकाँग येथील परिषदेत मार्गदर्शक आणि 'लॉरेल' या कंपनीत रिसर्च सायंटिस्टमधून कंपनीसाठी आठ नवे ब्रँड तयार केले. गडहिंग्लज येथील अंजू तुरंबेकर यांनी एशियन फुटबॉल कॉन्फीडरेशनतर्फे झालेल्या ए-लायसन कोचिंग परिक्षेत यश मिळविले. ही परीक्षा उत्तीर्ण होणारी ती राज्यातील पहिली व देशातील आठवी महिला आहे. सध्या ती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या ग्रासरुट डेव्हलपमेंट कोर्सची प्रमुख असून ए-लायसन प्रशिक्षक आहे. डॉ. वर्षा भगत गेली २१ वर्षे दिव्यांग मुले आणि व्यक्तिंना अधिकार आणि शिक्षण मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने नवी मुंबई महानगरपालिकेत दिव्यांगासाठी ईटीसी केंद्र सुरु केले. त्यांच्या या कामाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकप्रशासनातील 'सर्वोकृष्ट सेवा' पुरस्कार मिळाला आहे. पुणे येथील एका झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सरूबाई वाघमारे यांनी कचरा गोळा करण्याचे काम केले. पुणे येथील सामाजिक संस्थेसोबत काम करून कचरा व्यवस्थापन करून खत निर्मिती केली. त्या सध्या आरबीआय कार्यालयात ' कंपोस्ट पीट' चालवतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज