अ‍ॅपशहर

सांगली जिल्ह्यात जलयुक्तच्या १७ हजार कामांची चौकशी सुरू

जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्यातील ठाकरे सरकारने दिले आहेत. यानुसार सांगली जिल्ह्यात १७ हजार कामांची चौकशी सुरू झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील ४२१ गावांमधील कामांवर १७७ कोटींचा खर्च झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 3 Dec 2020, 1:56 am
म. टा. प्रतिनिधी, सांगली: फडणवीस सरकारच्या ( fadnavis government ) कालावधीत जलयुक्त शिवार योजनेतून ( jalyukt shivar abhiyan ) झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. यानुसार सांगली जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कामांची चौकशी बुधवारपासून सुरू झाली. मागील तीन वर्षात ४२१ गावांत १७७ कोटी रुपयांचा निधी खर्च करून जलयुक्त शिवारची कामे केली आहेत. सर्व कामांची कागदपत्रे घेऊन अधिकार्‍यांना मंत्रालयात बोलवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra fadnavis
सांगली जिल्ह्यात जलयुक्तच्या १७ हजार कामांची चौकशी सुरू


जललयुक्त शिवार योजनेतून राज्यात झालेल्या कामांबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. सांगली जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये आठ तालुक्यातील ४०३ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. सन २०१५-१६ मध्ये १४१ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ४ हजार ७२९ कामे पूर्ण झाली आहेत. २०१७-१८ या वर्षात १४० गावांमध्ये ७ हजार ९५१ कामांपैकी ७ हजार ८३४ कामे पूर्ण झाली आहेत.

मुंबईतील सिनेसृष्टी यूपीत हलविण्याचा वादावरून सतेज पाटील व चंद्रकांत पाटील यांच्यात कलगीतुरा

केंद्रीय मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

यातील अनेक कामांबद्दल स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. बोगस काम झाल्याचे आरोप केले जातात. जत तालुक्यात झालेल्या कामांच्या फाईल्स घेऊन अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकां-यांना कामांची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या सर्वच कामांची चौकशी होणार असल्याने अधिकार्‍यांत खळबळ उडाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज