अ‍ॅपशहर

सहकारी मित्राच्या अकाली निधनाने जयंत पाटील यांना अश्रू अनावर, म्हणाले...

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांना रविवारी एका सहका-याच्या अस्थी विसर्जनावेळी अश्रू आवरता आले नाहीत

Authored byउद्धव गोडसे | Edited byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2020, 7:48 pm
म. टा. प्रतिनिधी, सांगली: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांना रविवारी एका सहका-याच्या अस्थी विसर्जनावेळी अश्रू आवरता आले नाहीत. जवळचे सहकारी आणि मित्रांच्या अकाली निधनामुळे त्यांना गहिवरून आले. करोना संसर्गाने जवळचे अनेक लोक दगावल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले. मिश्कील स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळख असलेले मंत्री पाटील यांचे हळवे रूप यानिमित्ताने समोर आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jayant patil


राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलताना अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला. काही काळासाठी ते स्तब्ध झाले. जवळच्या लोकांना श्रद्धांजली वाहण्याची आलेली वेळ त्यांच्या कातर स्वरातून स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी जयंत पाटील म्हणाले, 'लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तेच लोक आज माझ्या हातून निसटत आहेत याचं दुःख होत आहे.

करोनाचा लढा निर्णायक वळणावर; CM ठाकरेंनी सांगितला 'हा' उपाय

'करोनामुळे जगभरात अनेक माणसं दगावली आहेत. भारतातही अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागला. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जवळचे लोक जयंत पाटील यांनी गमावले आहेत. मतदार संघात पोहोचताच दोन, तीन कार्यकर्ते, सहकारी, मित्रांच्या घरी सांत्वनासाठी जावे लागते. मित्र आणि कार्यकर्ते हीच संपत्ती मानणारे मंत्री पाटील यांना सहका-यांचे अकाली जाणे जिव्हारी लागत आहे.

गडचिरोलीत चकमक; पाच जहाल माओवादी ठार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज