म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्टार प्रचारक अमोल मिटकरी हे शनिवारी (ता. १९) जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. पाटील हे हेलिकॉप्टरद्वारे दौरा करणार आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवा येथे सकाळी नऊ वाजता प्रचारसभा होणार आहे. त्यानंतर कागल येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासाठी सकाळी ११.१० ते १२.३० या वेळेत मौजे सांगाव येथे सभा होणार आहे. त्यानंतर ते नेसरीकडे रवाना होतील. नेसरी येथे दुपारी १.१५ ते २.३० या वेळेत सभा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी दिली आहे.