अ‍ॅपशहर

कागल मूर्ती विसर्जन

कागलला गणराया विसर्जन म टा वृत्तसेवा, कागल कागल व परिसरातील सार्वजनिक मंडळाचे गणेश विसर्जन उत्साही वातावरणात करण्यात आले...

Maharashtra Times 25 Sep 2018, 4:00 am

कागलला गणराया विसर्जन

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल व परिसरातील सार्वजनिक मंडळाचे गणेश विसर्जन उत्साही वातावरणात करण्यात आले. यामध्ये डीजेला फाटा दिल्याने केवळ मुख्य रोडवरच गर्दी दिसून आली. दरम्यान कागल पालिकेने राबविलेल्या श्री मूर्ती दान उपक्रमाला अल्प प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे पालिकेनेच नदीत मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची सोय केली होती.

कागल शहर व उपनगरातील श्री गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात, वाद्यांच्या निनादात, फटाक्यांच्याअतिषबाजीत बाप्पांना निरोप देण्यात आला. शहरातील गणेश विसर्जन दूधगंगा नदीवर करण्यात आले. कागल पालिकेच्यावतीने मूर्ती नदीत विसर्जित न करता विधिपूर्वक पूजा-अर्चा करून ते दान स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. पालिकेचे आरोग्य विभागाचे नितीन कांबळे यांनी पालिकेचे कर्मचारी स्वच्छतेसाठी नदीकिनाऱ्यावर रुजू केले होते. परंतू मूर्ती नदीत विसर्जनासाठी क्रेनचीही सोय केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज