अ‍ॅपशहर

कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी धोका दिलाय म्हणत संजय पवारांचा कंठ दाटला, हमसून हमसून रडले

मला धैर्यशील मानेंविषयी काही बोलायचं नाही. कारण त्यांचा प्रवासच राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे असा राहिला आहे. पक्षाशी एकनिष्ठ न राहण्याचा त्यांचा इतिहास आहे. पण मला वाईट वाटतं की जे आमच्याबरोबर बैठकीला उपस्थित राहून गद्दारांना धडा शिकवण्याचं प्लॅनिंग करत होते, तेच मंडलिक आज बंडखोर गटाला जाऊन मिळाले आहेत. उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच धोका दिला. आता उद्धव ठाकरेंनी अशा गद्दारांवर विश्वास टाकू नये. परत पक्षात स्थान देऊ नये. ठाकरे कुटुंब आणि अवघी शिवसेना संकटात असताना मंडलिक असे वागूच कसे शकतात? अशा भावना व्यक्त करताना संजय पवारांचा ऊर भरुन आला अन् ते हमसून हमसून रडायला लागले.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2022, 1:49 pm

हायलाइट्स:

  • कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी धोका दिलाय
  • बंडखोरांनी राजीनामा द्यावा, हिम्मत असेल तर निवडणूक लढवावी
  • संजय पवारांचा ऊर भरुन आला, हमसून हमसून रडले
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना बेन्टेक्स म्हणून संबोधणारे आणि उद्धव ठाकरेंसोबतचे साथी सोने आहेत, असं म्हणणारे खासदार संजय मंडलिक हेच काल एकनाथ शिंदे गटात डेरेदाखल झाले. कोल्हापूरची जनता आता बेन्टेक्स कोण आणि सोने कोण? असा प्रश्न विचारतच असतानाच कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मात्र बंडखोर खासदारांविषयी बोलताना अश्रू अनावर झाले. उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच विश्वासघात केला. उद्धवसाहेबांनी आता गद्दारांवर विश्वास टाकू नये. कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी धोका दिलाय, अशा तीव्र भावना व्यक्त करताना संजय पवारांचा ऊर दाटून आला अन् ते हमसून हमसून रडायला लागले.
शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही खासदारांचे कार्यकर्ते वगळता इतर शिवसैनिक खासदारांनी उचलेल्या पावलाविरोधात आक्रमक झालेत आहेत. आज सकाळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या भावना जाणून घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी पोहोचले असता, संजय पवार यांना शिवसेनेची आताची परिस्थिती बघून भावना अनावर झाल्या. एकाबाजूला त्यांच्या बोलण्यात बंडखोरांविरोधात संताप होता, बदल्याची भावना होती, त्याचवेळी ठाकरे कुटुंबाविषयी आत्मीयता प्रेम जिव्हाळा होता. बंडखोरांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी याक्षणी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं. त्यांना कोल्हापूरचे शिवसैनिक जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान त्यांनी खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना दिलं.

भाजप शिंदेंच्या जवळकीने कोल्हापूरचं राजकारण बदललं; मुश्रीफ, बंटींसमोर ६ नेत्यांचं कडवं आव्हान
उद्धवसाहेब-परत यांना पक्षात स्थान देऊ नका

मला धैर्यशील मानेंविषयी काही बोलायचं नाही. कारण त्यांचा प्रवासच राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे असा राहिला आहे. पक्षाशी एकनिष्ठ न राहण्याचा त्यांचा इतिहास आहे. पण मला वाईट वाटतं की जे आमच्याबरोबर बैठकीला उपस्थित राहून गद्दारांना धडा शिकवण्याचं प्लॅनिंग करत होते, तेच मंडलिक आज बंडखोर गटाला जाऊन मिळाले आहेत. उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच धोका दिला. आता उद्धव ठाकरेंनी अशा गद्दारांवर विश्वास टाकू नये. परत पक्षात स्थान देऊ नये. ठाकरे कुटुंब आणि अवघी शिवसेना संकटात असताना मंडलिक असे वागूच कसे शकतात? अशा भावना व्यक्त करताना संजय पवारांचा ऊर दाटून आला अन् ते हमसून हमसून रडायला लागले.

मंडलिक-मानेंची शिंदे गटात एन्ट्री, शिवसैनिक म्हणतात, सोने सोडाच हे बेन्टेक्सपेक्षा वाईट निघाले
राजीनामा द्या, निवडणुकीच्या रिंगणात उतरा, मग दाखवतो...

"दोन्ही खासदार शिंदे गटात गेलेच आहेत तर माझं त्यांना आव्हान आहे, जर त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरावं. त्यांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही", असं संजय पवार म्हणाले.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज