अ‍ॅपशहर

अडीचशेवर ‌शिक्षकांची पगारविना उपासमार

कोल्हापूर ः शिक्षकांचे समायोजन करण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणारे स्था​निक शिक्षणाधिकारी आणि अतिरिक्त ​शिक्षकांना सामावून घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या संस्थाचालकांच्या कात्रीत सापडलेल्या ५५ शाळांतील अतिरिक्त २५३ शिक्षकांवर वेतनाअभावी गेल्या पाच महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे.

Maharashtra Times 24 Apr 2017, 3:00 am
Anuradha.kadam@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur 250 teacher without salary
अडीचशेवर ‌शिक्षकांची पगारविना उपासमार


Tweet:@anuradhakadamMt

कोल्हापूर ः शिक्षकांचे समायोजन करण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणारे स्था​निक शिक्षणाधिकारी आणि अतिरिक्त ​शिक्षकांना सामावून घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या संस्थाचालकांच्या कात्रीत सापडलेल्या ५५ शाळांतील अतिरिक्त २५३ शिक्षकांवर वेतनाअभावी गेल्या पाच महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या वर्षभरात जवळपास ३३ आंदोलने करूनही या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न ‘जैसे थे,’ आहे. या ​शिक्षकांना उधार-उसनवारी करून घरखर्च चालवावा लागत आहे.

घटती पटसंख्या आणि शाळांची वाढती संख्या यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला. यातून मार्ग काढण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील अन्य शाळांत करण्याचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी घेतला. तसेच या शिक्षकांचे मासिक वेतन समायोजन केलेल्या शाळांच्या संस्थाचालकांनी द्यावे, असा आदेश शिक्षण आयुक्तांनी दिला. अतिरिक्त ​शिक्षकांना ज्या शाळांत समायोजित केले त्या संस्थांकडून वेतन देणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित संस्था शिक्षक ज्या शाळेतून आले आहेत त्या मूळ संस्थांनी वेतन द्यावे, असा आग्रह धरून बसल्यामुळे पाच महिन्यांपासून हा प्रश्न भिजत पडला आहे.

२६ दिवस वाया

समायोजित शिक्षकांचे वेतन तातडीने देण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांनी २ मार्च २०१७ रोजी दिला. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून २९ मार्चअखेर या आदेशावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आदेश देऊनही शिक्षकांच्या वेतनाबाबत ​निर्णय घेण्यासाठी २६ दिवस प्रशासनाच्या दिरंगाईने वाया गेले.

प्रश्न का निर्माण झाला?

पूर्वी एका तुकडीला दीड शिक्षक असे प्रमाण होते. सध्या ३० मुलांसाठी एक शिक्षक असे प्रमाण आहे. शाळांची वाढती संख्या आणि विद्यार्थ्यांची विभागणी यामुळे पटसंख्या कमी होत आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या शाळा, सध्याच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे व्यस्त प्रमाण याचा कोणताही आराखडा निश्चित नाही. यामुळे शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे.


अद्याप गेल्या शैक्षणिक वर्षात ​अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजन व वेतनप्रश्नाचा गुंता सुटलेला नाही. त्यातच २०१६-२०१७ या वर्षाची संचमान्यता पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत किमान १०० शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या काळातील अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सुटण्याची आवश्यकता आहे.

राजेश वरक, अध्यक्ष, कोल्हापूर माध्यमिक शिक्षक संघ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज