अ‍ॅपशहर

कासव चौकातून ओटी स्वीकारणे बंद

श्री अंबाबाई मंदिरातील कासव चौकात, देवीसाठी ओटी स्वीकारणे पुजाऱ्यांनी शनिवारपासून बंद केले.

Maharashtra Times 25 Jun 2017, 3:00 am
कोल्हापूर ः पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा नियम डावलून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील कासव चौकात, देवीसाठी ओटी स्वीकारणे पुजाऱ्यांनी शनिवारपासून बंद केले. देवस्थान समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ओटी स्वीकारण्यास पुजाऱ्यांना मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, समितीकडून अंमलबजावणीच्या सूचना येण्यापूर्वीच पुजाऱ्यांनी स्वत:हूनच हे पाऊल उचलले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur ambabai temple dispute
कासव चौकातून ओटी स्वीकारणे बंद


करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील देवीला घागरा-चोलीचा पेहराव केल्यावरून पुजारी विरुद्ध भाविक हा वाद अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनापर्यंत पोहोचला. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी करून तीन महिन्यांत अहवाल द्यावा असा आदेश गुरुवारी दिला. शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मासिक बैठक बलभीम बँकेतील कार्यालयात झाली. समितीने पुजाऱ्यांना कासव चौकात येऊन भाविकांकडून ओटीचे साहित्य स्वीकारण्यास मनाई करण्याचा ठराव केला. समितीकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात येणार होती. तत्पूर्वीच सध्या पूजेची साप्ताहिक जबाबदारी असलेले पुजारी सारंग मुनिश्वर यांनी कासव चौकातून ओटीचे साहित्य स्वीकारणे बंद करीत असल्याचे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज