अ‍ॅपशहर

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा

मुंबईहून कोल्हापूरकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये जेजुरी जवळच्या राजेवाडी स्टेशनजवळ दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी कोल्हापूर आणि पुणे येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Maharashtra Times 26 Oct 2017, 6:35 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur cash gold mobile looted in mahalaxmi express robbery
महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा


मुंबईहून कोल्हापूरकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये जेजुरी जवळच्या राजेवाडी स्टेशनजवळ दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी कोल्हापूर आणि पुणे येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

पहाटे दीड-दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. महालक्ष्मी एक्स्प्रेस बुधवारी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटली होती. रात्री दीडच्या सुमारास रेल्वे राजेवाडी स्टेशनजवळ पोहोचली. सिग्नल न मिळाल्याने चालकाने रेल्वे थांबवली. रेल्वे थांबताच दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत खिडक्यांमधून हात घालून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटले. तसेच प्रवाशांकडील मोबाइलही या दरोडेखोरांनी हिसकावले. सात ते आठ डब्यात हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला. झोपेतील प्रवाशी जागे झाल्यानंतर या दरोडेखोरांनी पळ काढला. रेल्वे चालकाने स्टेशनमध्ये चौकशी केल्यानंतर सिग्नलमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. दरोडेखोरांनी सिग्नलमध्ये बिघाड करून लूट केल्याचे स्पष्ट होताच राजेवाडी स्टेशनमधील अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मात्र रेल्वेत सुरक्षा पोलीस नसल्याने तक्रार नोंदविता आली नाही. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर तीन प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. तर काही प्रवाशांनी मिरज स्थानकात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला.याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज